॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

11 months ago
approved

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो, यावरून त्याची किंमत होत नसते, तो इतरांची किती किंमत करतो, यावरून त्याची किंमत ठरत असते. शुभ सकाळ

11 months ago
approved

मी लोकांसाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही… कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात

11 months ago
approved

स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे.. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. शुभ सकाळ

11 months ago
approved

कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..

11 months ago
approved

जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स” पुरेसा असेल तर “सुखाचा चेक” कधीच “बाउंस” होणार नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी, आणि,नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. शुभ सकाळ!

11 months ago
approved

“शुभसकाळ” म्हणजे केवळ, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर, दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची, काढलेली “आठवण” आहे… शुभ सकाळ!

11 months ago
approved

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात. शुभ सकाळ!

11 months ago
approved

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर, “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢