॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही, त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

11 months ago
approved

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं, ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात, वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

11 months ago
approved

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत रहा.

11 months ago
approved

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

11 months ago
approved

गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीच कारण बनायचं.

11 months ago
approved

तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खात असतात, तलावतलं पाणी संपून कोरडा होतो, तेव्हा किडे मास्यांना खात असतात, संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

11 months ago
approved

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

11 months ago
approved

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

11 months ago
approved

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय.

11 months ago
approved

जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢