॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल, की वाटेतले मुके दगडही, प्रश्न विचारू लागतील.

11 months ago
approved

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला, तू का निघून गेलीस.

11 months ago
approved

आठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही.

11 months ago
approved

तू दिलेल्या दुःखाने, मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

11 months ago
approved

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो, ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा, त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो, ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो, हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो, चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो, नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो, ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो, ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची, कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची, आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो, मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो, नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो, तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो, ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा, आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो, बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची, मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो, गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची, आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो, कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो, तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो, गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो, रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो, दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो, मनामधी तेव्हा खरच फार रडायचो, गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो, कस आहे सासर सारी विचारपूस करायचो, नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो, आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो, गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

11 months ago
approved

येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

11 months ago
approved

दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन!

11 months ago
approved

शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢