॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो. मग बायको कुणाची पण असो. 😊😂😂

11 months ago
approved

भारताचा राष्ट्रीय खेळ, हॉकी ---धोक्यात. भारताचा राष्ट्रीय प्राणी, बाघ ----धोक्यात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर ----धोक्यात. भारत कृषिप्रधान देश , भारताचा शेतकरी ------ धोक्यात. भारताची सीमारेषा ------ धोक्यात. भारताचा सैनिक ------ धोक्यात.... भारताच आर्थिक चलन ------ धोक्यात. भारताच पर्यावरण ------धोक्यात .भारताच विधानभवन ------ धोक्यात.. भारताच्या बस,ट्रेन,विमान----- धोक्यात भारताची संस्कृती ------ धोक्यात. भारताची महिला ------धोक्यात.भारताचा इतिहास/वर्तमान/भविष्य ------अंधाराततर मग कायघंटा होत आहे " भारत निर्माण. विचार करा जाब विचारायालाच हवा ईतकी शेअर करा पोस्ट कि प्रत्येक जण आता जागा झालाच पाहिजे

11 months ago
approved

वडील :- पास हो किंवा नापास, तुला Bike मिळणारच...! मुलगा :- नादच खुळा... वडील :- पास झालास तर Pulsar 180 .. college ला जायला..., नापास झालास तर M80.. रानात वैरण आणायला जायला आणि दुध घालायला...!!!

11 months ago
approved

तो म्हणाला आज 'वॅलेनटाइन डे' ती म्हणे,नवे काय? रोजचेच रडे चल ना गं.. मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक ! ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक ! त्यानं म्हटलं, आज बायको नको गं.. तुझ्यातली प्रेयसी हवी तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..! रोज नवी फॅण्टसी हवी तो म्हणाला चालेल गं, इतकंही हसलीस तरी ! हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी त्याच्या स्वच्छ नजरेला ती भुलून गेली आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली त्याला म्हणाली.. वेड्या........! हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त वर्षातून एकदाच साजरा होतो.. तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो.. नजरेत नजर मिसळायला कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही अन एकरुप झालेल्या जीवांना 'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही

11 months ago
approved

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...! स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शाेधायचं डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ....का मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं. जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....! तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा. मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे. जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं. आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!

11 months ago
approved

गरीब माणुस दारु पितो, मध्यमवर्गीय मद्यपान करतो, तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात ! काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते, काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो, तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते ! गरीब माणुस करतो ते लफडं, मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम, तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर ! शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते, शब्दाने शब्द वाढला की भांडण होते शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...

11 months ago
approved

एका भाषणाच्या वेळी सोनिया बाईंनी एक गोष्ट सांगितली...... " एक बाप होता....त्याने त्याच्या ३ मुलांना प्रत्येकी १०० रुपयेदिले आणि संगितले की अशी वस्तु आणा ज्याने आपली रूम भरून जाईल..... पहिल्या मुलाने १०० रुपयाचे लाकडं आणले..... पण ते पुरेशे नव्हते.. दुसर्या मुलाने १०० रुपयाचा कापूस आणला.....पण तो पुरेसा नव्हता... आणि तिसर्या मुलाने ५ रुपयाची मेणबत्ती आणली,ती पेटवली व प्रकाशाने पूर्ण रूम भरून गेली......" पुढे कपिल सिब्बल उठला आणि म्हणाला , 'तो तिसरा मुलगा म्हणजेच राहुल गांधी.... जेंव्हापसून ते देशाच्या राजकरणात उतरले आहेत...देशाची प्रगति झाली आहे' . . . तेवढ्यात खालून 'अण्णा हजारे' यांचा आवाज आला..... . . . "ते सर्व ठीक आहे.....पण बाकीचे ९५रुपये कुठे गेले ???

11 months ago
approved

काही अनुत्तरीत प्रश्न : १] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का? २] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात? ३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो? ४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात? ५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही? ६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात? ७] 'मीच म्हणून तुमच्याशी संसार केला' असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते? ८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो? ९] हॉटेलात इडली सांबारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची? १०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो? ११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते? १२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात? १३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते? १४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात? १५] आपला जन्म इतरांसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत?

11 months ago
approved

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं... बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला, तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ? 

11 months ago
approved

बायको : " माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा. " . . नवरा : " बरं .. पण वचन दे .. . . . . . माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील ..

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢