॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

मी विचारलं - "वाढदिवसाला कुठे जाऊ या ?" ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !" मी तिला स्वयंपाक घरात नेलं! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

11 months ago
approved

आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली- "काय मी भयंकर दिसतेय... ? तुमचं मत काय आहे ? " मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..." ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

11 months ago
approved

लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट काय हवं ? विचारलं तेव्हां म्हणाली- "असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!" मी वजन काटा दिला! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

11 months ago
approved

टी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! .........आणि भांडण जोरात सुरु झालं !

11 months ago
approved

चावी विसरल्याने मी बायकोबरोबर बाहेर मुलांची वाट पहात बराच वेळ उभा होतो.  . . शेजारच्या घरातून मस्त चहाचा वास आला.....😉 . . मी हिला म्हणालो... "तुझे....गुढघे दुखत असतील नाही ?"😉 . . शेजारच्या घराला आतुन कडी लावल्याचा आवाज आला !!!😉 . . स्थळ : अर्थातच पुणे ..

11 months ago
approved

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो "कळावे" पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे........😉 २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे..........😉 ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी अडीच किलो कांदे पाठवित आहे. तळावे..........😉 ४) प्रिय मित्रा, मी फोर व्हीलर घेतली जळावे........😉 ५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल गायछाप तंबाखू पाठवित आहे. मळावे...........😉 ६) प्रिय आई, तुला नको असलेली पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे. छळावे..........😉 ७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला कळावे..........😉 आणि तुम्ही हसुन हसून लोळावे......😉 मेसेज आवडला तर दुसऱ्या नंबर वर वळवावे...... रिपीट झाला असेल तर वगळावे......😉

11 months ago
approved

तो फार सज्जन माणूस होता. त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही. त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही. त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही... .... तो मरण पावला, तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला... .... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'

11 months ago
approved

नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...'' क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!

11 months ago
approved

जो एकटा पितो तो नरकलोकात जातो जो दोस्तांबरोबर पितो तो स्वर्गलोकात जातो जो पीतच नाही, तो... .... तो 'जसलोक'मध्ये जातो!!!!

11 months ago
approved

आयुष्यात कधी ना कधी आपण स्वत:ला काही महत्त्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत... आपण कोण आहोत?... कोठून आलो आहोत?... कोठे निघालो आहोत?... आणि जेव्हा तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का?!!!

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢